Site icon

Nashik : विहितगावला गुटख्याचा साठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विहितगाव परिसरात किराणा दुकानासह वाहनतळाच्या वाहनात गुटख्याचा साठा करणाऱ्या संशयितास अमली पदार्थविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित सोमनाथ सुखलाल चौधरी (४६ रा. विहितगाव) यास पकडले आहे. त्याच्याकडून ७९ हजारांच्या सुगंधित गुटख्यासह एमएच १५, ईजी १०२८ क्रमांकाचे वाहन पोलिसांनी जप्त कररून संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार शहरात अमली पदार्थ व गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करीत आहेत. किराणा दुकानात सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा साठा करून विक्री करत असल्याची व संशयिताने बंगल्याच्या वाहनतळातील एका खोलीत तंबाखूचा साठा ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी सापळा रचण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार संजय ताजणे, देवकिसन गायकर, नितीन भालेराव, रवींद्र दिघे, अनिरुद्ध येवले, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे आणि महिला अंमलदार अर्चना भड यांनी सापळा रचून तंबाखू वाहतूक करणारा संशयित सोमनाथ चौधरी यास ताब्यात घेतले.

टेम्पोसह ७९ हजार रुपयांचा सुगंधित गुटख्याचा साठा जप्त करून त्याच्याविरोधात उपनगर पोलिसांत अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासात संशयिताने हा माल भद्रकाली परिसरातून खरेदी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस गुटखा विक्री करणाऱ्या पुरवठादारांचाही शोध घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

The post Nashik : विहितगावला गुटख्याचा साठा जप्त appeared first on पुढारी.

Exit mobile version