Nashik : वेळेच्या निर्बंधात बदल करण्याची नाशिकमधील व्यापाऱ्यांची सरकारकडे मागणी

<p>बाजारपेठेत होणारी गर्दी कमी करण्यासाठी पूर्णपणे लॉक डाऊन करा किंवा व्यवहार सुरळीत सुरू करा अशी मागणी थेट आरोग्य मंत्र्यांनीच केल्यान वाढती गर्दी सरकारसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे, यासंदर्भात आम्ही नाशिकच्या धान्य किराणा व्यपारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता पुन्हा लॉक डाऊन करू नका, दुपारी चारची वेळ वाढवून 7 ते 8 पर्यंत करा अशी मागणी होत आहे, शनिवार रविवारचा वीकेंड लॉकडाऊन असल्यानं शुक्रवारी आणि सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे त्यांमुळे वीकेंड लॉक डाऊन बाबतीत पुनर्विचार करण्याची मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे.</p>