
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय रस्सीखेचीमध्ये भाजपच्या तुलनेत शिंदे गटच भारी पडत असल्याने तसेच नाशिकमधूनही अनेक माजी नगरसेवक शिंदे गटातच प्रवेश करत असल्याने राजकीयदृष्ट्या भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्याच दृष्टीने निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षातील संघटनात्मक बदलाकरता चाचपणी करण्यात येणार असून, वसंत स्मृती येथे शुक्रवारी (दि. २३) बैठक होणार आहे.
राज्याच्या सत्तेत भाजपचे संख्याबळ जास्त असूनही, भाजपला नाशिकमधील स्थानिक पातळीवर संघटनात्मक प्रभाव दाखवता आलेला नाही. त्यामुळे शिंदेगट डोईजड होऊ नये आणि त्याचा फटका निवडणुकीत नगरसेवकांना बसू नये, यासाठी दक्षता घेण्याकरता भाजपकडून पावले उचलली जात आहेत. रविवारी (दि. २५) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे खानदेश महोत्सवानिमित्त नाशिकला येणार असल्याने स्थानिक पातळीवरील राजकारणाची माहिती पदाधिकाऱ्यांकडून दिली जाणार आहे, तर शुक्रवारी (दि. २३) संघटनमंत्री रवि अनासपुरे व बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत दुपारी २.३० ला संघटनात्मक बैठक होत आहे.
बैठकीस पदाधिकारी व माजी नगरसेवकांना तसेच मंडल स्तरावरील सर्वच पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप हे शहराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आल्यामुळे युवा वर्गाकडून नाराजी व्यक्त केली जात असून, यासंदर्भात थेट माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे समजते.
हेही वाचा :
- नगर : कबड्डीच्या ‘किताब’साठी भिडणार ‘नगर’
- Bikini Story : बिकिनी आली तरी कुठून? सेलिब्रिटींना बिकिनीचं इतकं वेड का?
- नगर जिल्ह्यात 36 लाख साखर पोत्यांचे उत्पादन
The post Nashik : शिंदे गटात इनकमिंग वाढत असल्याने भाजपात अस्वस्थता appeared first on पुढारी.