
नाशिक (सप्तशृंगीगड) : पुढारी वृत्तसेवा
श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर आई भगवतीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची पिकअप गाडी (क्र. एम.एच 18 बी.8167) सप्तशृंगीच्या घाटात उलटल्याची घटना घडली. या घटनेत चार भाविक किरकोळ जखमी झाले असून जखमींना वणी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या गाडीत सर्व 32 भाविक होते. घाटातून जात असताना चालकांचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटी झाली. आज मंगळवार असल्याने भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने घाटात सर्वञ गाड्यांची रांग लागली होती. अपघात किरकोळ असल्याने मोठी हानी टळली.
हेही वाचा :
- भाजपच्या उमेदवारीमुळे दिल्ली महापौरपदाची निवडणूक बनली रंगतदार
- कोळपेवाडी : 2095 शेतकर्यांना मिळणार 50 हजार रुपये
- चंदनापुरीच्या शेतकर्याने सोडल्या टोमॅटोत मेंढ्या!
The post Nashik : सप्तशृंगी घाटात पिकअप उलटली, 4 भाविक जखमी appeared first on पुढारी.