Nashik : सहलीसाठी गेलेल्या नाशिकच्या तरुणाचा हिमाचल प्रदेश मध्ये मृत्यू

नाशिकच्या तरुणाचा हिमाचलमध्ये मृत्यू,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

हिमाचल प्रदेश येथे सहलीसाठी साठी गेलेल्या इंदिरानगर येथील चैत्र बिल्डर्सचे संचालक कौस्तुभ चैत्रा संतोष हुदलीकर (२९) यांचा मृत्यू झाला. आप्तेष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी ते आपल्या दोघा मित्रांसह फिरण्यासाठी गेले होते.  हिमाचल प्रदेश मधील लाहौल -स्पाती जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून दोन हजार फूट उंचीवर असलेल्या काजा या डोंगरावर ते फिरत होते. अति उंचीमुळे ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा नसल्याने ते खाली कोसळले.

त्यांना त्यांच्या मित्रांनी स्थानिक रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर ते सावध झाले आणि व्यवस्थित झाले असे वाटत असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. सुमारे दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांना नऊ महिन्याचा मुलगा आहे. नाशिक मधील बांधकाम व्यावसायिक, सावाना सांस्कृतिक समितीचे सदस्य, कवी आणि लेखक संतोष हुदलीकर यांचे ते चिरंजीव होत. अत्यंत मनमिळावू आणि उत्साही असणाऱ्या कौस्तुभ यांचे निधन झाल्याने संपूर्ण इंदिरानगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. E

The post Nashik : सहलीसाठी गेलेल्या नाशिकच्या तरुणाचा हिमाचल प्रदेश मध्ये मृत्यू appeared first on पुढारी.