Nashik : सातपूर कॉलनीत अज्ञात टवाळखोरांची दहशद, मध्यरात्री वाहनांची तोडफोड

सातपूर सात वाहने फोडली,www.pudhari.news

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

सातपूरला अज्ञात टवाळखोरांनी धूमाकूळ घातला आहे. सातपूर कॉलनी मधील जिजामाता मनपा शाळा व मैदान परिसर लगत रस्त्याच्या कडेला घरासमोर पार्किंग केलेल्या तब्बल सात चारचाकी वाहनांची अज्ञात टवाळखोरांनी तोडफोड केली.

याबाबत सविस्तर बातमी अशी की, बुधवार (दि.१८) मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञातांनी परिसरात दहशत पसरविण्याच्या हेतूने सातपूर कॉलनी परिसरात राहणारे कृष्णा बोडके यांच्या दोन कार व जीवन जाधव, भगवान मोगल व इतर नागरिकांच्या अशा एकुण सात वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. यामध्ये वाहन क्रंमाक एमएच १५ डीएम १४६५,  एमएच १५ एफव्ही २९७१, एमएच १४ बीएक्स ४०५१, एमएच १५ बिडी १६०२, एमएच १५ जीएल ३१३९ अशा एकूण सहा ते सात चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले.

याच परिसरात एका खासजी ट्रॅव्हल्स कंपनीची बस फोडल्याची घटना घडून अजून महिनाही झाला नाही तोच दुसरी घटना सातपूर परिसरात घडल्याने सातपूर व सातपूर कॉलनी परिसरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे.  संशयित टवाळखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

परिसरात व मनपा च्या मोकळ्या मैदानावर टवाळखोर मुले रात्री उशिरापर्यंत आरडाओरडा व दहशत करीत उभे असतात अशा मुलावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मनोज आहिरे यांनी पोलीस आयुक्त व सातपूर पोलिस प्रशासनाने कडे केली आहे.

संशयीत टवाळखोर मुलांचा शोध सुरू आहे. टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना कुणावरही संशय असल्यास माहिती कळवावी. परिसरातील नागरिकांनी जागृत होऊन सीसीटीव्ही कॅमेरा बसवून घ्यावेत जेणेकरुन पोलिसांना तपास करण्यास मदत मिळेल.

महेंद्र चव्हाण, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर

 

सातपूर कॉलनी परिसरात दुचाकीवर टवाळखोर मुले कोयता घेऊन फिरत होते. त्यांनीच हा प्रकार केला असावा. या टवाळखोर समाजकंटकाचा शोध घेऊन पोलीस प्रशासनाने परिसरातून त्यांची धिंड काढावी व नागरिकांना दहशत मुक्त करावे.

सलीम शेख, मा.नगरसेवक

हेही वाचा :

The post Nashik : सातपूर कॉलनीत अज्ञात टवाळखोरांची दहशद, मध्यरात्री वाहनांची तोडफोड appeared first on पुढारी.