Nashik : सावरकर थीमपार्कसह संग्रहालय उभारणार : मंत्री लोढा

मंत्री लोढा

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची जन्मभूमी असलेल्या भगूरला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन भव्य सावरकर थीमपार्कबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारणार असून, या कामासाठी पाच कोटींची तरतूद करणार असून, एक वर्षात पर्यटनस्थळ नागरिकांसाठी खुले करणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली.

वीर सावरकर आत्मसमर्पण दिनानिमित्त स्मारकात आयोजित कार्यक्रमात मंत्री लोढा बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, भगूर शिक्षण संस्था कार्याध्यक्ष एकनाथ शेटे, साप्ताहिक विवेक संपादक अश्विनी मयेकर आदी उपस्थित होते. यावेळी देशभक्ती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच नूतन शाळेकडून अनिल कवडे यांनी मंत्री लोढा यांचा, तर सचिन पाटील यांनी खा. गोडसे, मयेकर यांचा सत्कार केला. स्मारकात वेळोवेळी सहभाग, गीतगायन तसेच सावरकर जीवन निबंध स्पर्धेत पहिले आलेल्यांसह चारुदत्त दीक्षित, दीपिका बस्ते, गीतांजली सावंत, साक्षी करंजकर, नीलेश राव, रुतुजा रोकडे, अंकिता करंजकर यांचा लोढा यांच्या हस्ते सत्कार झाला.

भगूर शहरातील सावरकरांचे अष्टभूजा मूर्ती ठेवलेले मंदिर, शिक्षण झालेली शाळा, स्मारकातील सर्व कामे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून पूर्ण करण्यात येईल व सध्या २ हजार स्वे. फुटांचा थीमपार्क १० पर्यंत मंजूर करून यात सर्व साहित्य उपलब्ध करून देणार असल्याचे लोढा म्हणाले. दरम्यान, सकाळी नूतन विद्यामंदिर ते सावरकरांच्या स्मारकापर्यंत अभिवादन पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थी-शिक्षकांसह सावरकरभक्त, भगूरकर सहभागी झाले होते. यात सावरकरांच्या अष्टभूजा देवीच्या पालखीचे आकर्षण होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष तानाजी करंजकर, गिरीश पालवे, प्रसाद आडके, शेखर कस्तुरे, मृत्युंजय कापसे, अण्णाजी कापसे, नीलेश हासे आदी उपस्थित होते. योगेश सोमन लिखित सावरकर आणि मृत्यू या संवादाचे बद्रिश कट्टी व आदित्य धलवार यांचे अभिवाचन झाले.

हेही वाचा :

The post Nashik : सावरकर थीमपार्कसह संग्रहालय उभारणार : मंत्री लोढा appeared first on पुढारी.