Nashik : सिडकोत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

विनयभंग

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सिडकोतील एका माध्यमिक शाळेतील शारीरिक शिक्षण विषय शिकविणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिडकोतील एका माध्यमिक विद्यालयात ६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ही घटना घडली. पीटी विषयाचा शिक्षक संशयित रवींद्र नाकील याने विद्यार्थिनीसोबत जवळीक साधत तिच्यासोबत गैरवर्तन केले. विद्यार्थिनीने घरी जाऊन ही सर्व बाब पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर, पोलिस निरीक्षक नंदन बगाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक हरसिंग पावरा तपास करीत आहे. 

हेही वाचा :

The post Nashik : सिडकोत शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग appeared first on पुढारी.