सुरगाणा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने नद्या, नाल्यांना पूर आला असून, मंगळवारी (दि.12) अलंगुण गावाशेजारील बंधारा ओव्हरफ्लो होऊन गाव नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरल्याने हाहाकार उडाला होता. मात्र, गावातील माजी आमदार स्वत: जे. पी. गावित तसेच इतर ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत बंधार्‍याचे पाणी वेगळ्या मार्गाने काढून दिल्याने मोठी दुर्घटना टळली.
मात्र, यात काही घरांची पडझड तसेच विजेचे खांब कोसळले आहेत.गेल्या सहा दिवसांपासून अलंगुण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या गावाच्या बाजूला गावबंधारा असून, तो पहाटे ओव्हरफ्लो झाला.

मात्र, येथे माजी आमदार जे. पी. गावित आणि उपसभापती इंद्रजित गावित यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन पोकलेन मशीनच्या मदतीने भरपावसात उभे राहून शर्थीच्या प्रयत्नाने वेगळ्या मार्गाने काढून दिल्याने गावातील पाणी कमी होऊन जीवित व वित्तहानी टळली.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लीक करा

हेही वाचा :

The post Nashik : सुरगाण्यातील अलंगुण गावात पुराचे पाणी (व्हिडीओ) appeared first on पुढारी.