Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण

सोयाबिन कापूस पिकविमा संरक्षण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खरीप हंगामात पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती तसेच पावसातील खंड यासारख्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना 2023 मध्ये लागू केली आहे. त्याअंतर्गत सोयाबिन व कापूस या पिकांना 50 हजार रुपयांचे पिकविमा संरक्षण मिळणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी कळविले आहे. याबाबत जनजागृतीसाठी असलेल्या विमा रथाचे अनावरण जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी https://pmfby.gov.in/farmerRegistrationForm या पोर्टलवर लॉगीन करून किंवा नजीकच्या CSE /VLEकेंद्रात निव्वळ एक रुपया भरून शेतकऱ्यांना नोंदणी करता येते. तसेच जिल्ह्यात ओरिएण्टल इन्शुरन्स या कंपनीची प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नियुक्ती केली आहे. भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका ही तृणधान्य व कडधान्य तसेच भुईमूग, कारळा, सोयाबिन ही गळीत धान्य पिके आणि कापूस खरीप कांदा ही नगदी पिके अधिसूचित केलेल्या क्षेत्रात लागू राहतील. पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग इत्यादी बाबींमुळे आणि हंगामाच्या शेवटी उत्पन्नात येणारी घट तसेच खरप हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान किंवा हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लागवड न झाल्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा पिकविम्यात समावेश आहे. त्याचप्रमाणे पिकाच्या काढणीनंतर नुकसान झाल्यासही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यास विमा कंपनी बांधिल असणार आहे.

पात्र लाभार्थी कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना ऐच्छिक असली तरी या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही श्री. सोनवणे यांनी केले आहे.

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम (रुपये प्रतिहेक्टर)

मका – 35 हजार 598, कापूस  50 हजार, सोयबिन 50 हजार, बाजरी- 27 हजार 500, तूर 36 हजार 800, मूग 22

हेही वाचा : 

The post Nashik : सोयाबिन व कापसाला 50 हजारांचे पीकविमा संरक्षण appeared first on पुढारी.