
सिडको/नाशिक : एका खासगी रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर तेथील डॉक्टरनेच बलात्कार केल्याची घटना सिडकोत उघडकीस आली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित डॉ. उल्हास पांडुरंग कुटे (५०, रा. सिडको) हे रात्री 10.30 च्या सुमारास सिडको येथील त्यांच्या खासगी रुग्णालयामध्ये गेले असता, त्याच ठिकाणी राहणाऱ्या 16 वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेका रूममध्ये एकटी असल्याची संधी साधत हातपाय दुखत असल्याच्या निमित्ताने तिच्या रूममध्ये प्रवेश करत तिच्यावर अत्याचार केला. तसेच झालेला प्रकार कुणाला सांगितल्यास पीडितेला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड ठाण्यात संशयित आरोपी डॉ. उल्हास कुटे याच्याविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख व वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, महिला पोलिस उपनिरीक्षक सोनल फडोळ अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- हातावरही दिसतात मधुमेहाची लक्षणे, जाणून घ्या अधिक
- भिगवण : पोलिसाने केली चोराशीच तडजोड! फिर्यादी ठरला चोर आणि चोर ठरला साव
- सातारा जिल्ह्यात 30 टक्के ई-केवायसीचे काम रखडले
The post Nashik : सोळा वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर बलात्कार, नाशिकमध्ये डॉक्टरला अटक appeared first on पुढारी.