Nashik | स्पेशल रिपोर्ट | नाशकात भाजप-मनसे युती? राज आणि पाटील यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

<p>नाशिक दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यांत सकाळी 10 ते 15 मिनिटे भेट झाली. दोन्ही नेते 3 दिवसांपूर्वी नाशिकमध्ये दाखल झाले होते, दोघांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहातच होता, त्यामुळे शुक्रवारपासूनच या दोघांच्या भेटीची शक्यता व्यक्त होत होती. अखेर रविवारी सकाळी उभयतांमध्ये भेट झाली. मनसे आणि भाजप यांची नाशिक महापालिकामध्ये 2012 ते 2017 या पंचवार्षिकला सत्ता होती. यानंतर भाजपने बहुमताचा आकडा गाठला तर मनसेची सदस्य संख्या 40 वरून 5 वर आली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यानं मनपा निवडणुकीत भाजपला तिन्ही पक्षांकडून लक्ष्य केले जाणार आहे. त्यामुळे आहे ती सत्ता राखण्यासाठी भाजप आणि गेलेली सत्ता पुनः प्राप्त करण्यासाठी मनसे कामाला लागली आहे.</p>