Nashik : हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरुन तरुणाचा मृत्यू; मालक, मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल

<p>नाशिकमधील विनोद गिते मृत्यूप्रकरणी एक्सलन्सी ईन हॉटेल व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात आलंय. या प्रकरणी हॉटेल मालक आणि मॅनेजरविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिडको परिसरात राहणारा विनोद गिते हा तरुण लग्नानिमित्त आलेल्या त्याच्या नातेवाईकांना रूम बघण्यासाठी पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या हॉटेल एक्सिलन्सी ईनमध्ये आला होता. यावेळी पहिल्या मजल्यावर तो आला. मात्र हॉटेलच्या नुतनीकरणाचे काम सुरु असल्याने तोडकाम करण्यात आलं होतं. मात्र ते लक्षात न आल्याने विनोद थेट जेसीबीने खोदलेल्या २० फूट खोल खड्ड्यात कोसळला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.&nbsp;</p> <p>&nbsp;</p>