Site icon

Nashik : अंबादास दानवे आज नाशिक दौऱ्यावर

नाशिक :  मुसळधार पावसामुळे उदभवलेल्या पूरपरिस्थितीमुळे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (दि. ५ ) रोजी सकाळी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत.

सकाळी ८.30 वाजता नाशिक येथील ता. वांजरवाडी येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सकाळी ९.30 वाजता सोनंबे ता. सिन्नर येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गुरदरी बंधाऱ्याची पाहणी करून शेतकरी व अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. सकाळी १० वा. सिन्नर शहरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी करतील.

The post Nashik : अंबादास दानवे आज नाशिक दौऱ्यावर appeared first on पुढारी.

Exit mobile version