Nashik : ‘आप’च्या दिल्ली विजयाचा नाशिकमध्ये जल्लोष

आप,www.pudhari.news

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीमध्ये चुरशीच्या लढतीत आम आदमी पक्षाने विजय मिळविल्याबद्दल नाशिकमध्ये पक्षाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. दिल्ली महानगरपालिका निवडणुकांचे निकाल बुधवारी (दि. ७) जाहीर झाल्यानंतर ‘आप’ च्या कार्यकर्त्यांनी सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आनंदोत्सव साजरा केला. तसेच नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी ॲड. प्रभाकर वायचळे, गिरीश उगले, योगेश कापसे, ॲड. बंडूनाना डांगे, श्वेतांबरी आहेर, प्रमोदिनी चव्हाण, अल्ताफ शेख, अमोल लांडगे, नीलेश दिंडे, नितीन भागवत, मेघराज भोसले, स्वप्निल घिया, डॉ. शरद बोडके, चंदन पवार, साहिल सिंग, अनिल कौशिक, बाळासाहेब बोडके, माजीद पठाण, अमर गांगुर्डे, नितीन ठाणेकर, नविंदर आहलुवालिया, विकास पाटील, अनिल फोकणे, प्रदीप लोखंडे, सुमित शर्मा, विलास मोरे, शकील शेख, विश्वजित सावंत, शुभम पडवळ, मुस्तफा शाकीर, राहुल तुपे, पद्माकर आहेर आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

 

The post Nashik : 'आप'च्या दिल्ली विजयाचा नाशिकमध्ये जल्लोष appeared first on पुढारी.