Nashik : एकलहरे ग्रामपंचायतीच्या लढतीत विशाल संगमनेरे ठरले किंगमेकर, शंकर धनवटे यांचा पराभव

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत थेट सरपंच पदाच्या निवडणूकीत विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे यांचा दारुण पराभव झाला. अरुण दुशिंग यांनी त्यांचा पराभव केला. भाजपचे माजी नगरसेवक विशाल संगमनेरे हे दुशिंग यांच्या विजयाचे शिल्पकार व किंगमेकर ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

निर्मलग्राम विकास पॅनल धनवटे गटाचे 10 सदस्य तर परिवर्तन पॅनल विशाल संगमनेरे, दुशिंग गटाचे 7 सदस्य ग्रामपंचायत मध्ये निवडून आले. एकूण 17 जागांसाठी व थेट सरपंच पदासाठी लढतील चुरस पाहायला मिळाली. सरपंच पदाच्या लढतीत अरुण परशुराम दुशिंग यांना 2532 तर शंकरराव धनवटे यांना 1778 मते प्राप्त झाली. धनवटे यांचा 754 मतांनी पराभव केला.

प्रभाग एक मधून अनुसूचित जमातीसाठी झालेला लढतीत संदीप दिलीप जाधव यांना 878 मते मिळून, सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या लढतीत मधुकर कापसे हे 838 मते मिळवून तर अनुसूचित जमाती स्त्री साठी झालेल्या लढतीत निर्मला मधुकर इंगळे 872 मते मिळून विजयी झाल्या.

प्रभाग दोन मधून अनुसूचित जमातीसाठी झालेल्या लढतीत सचिन श्रीमंत होलिन यांना 230 मध्ये तर सर्वसाधारण जागांसाठी झालेल्या लढतीत निलेश विश्राम धनवटे यांना 256 मते, सर्वसाधारण स्त्री जागेसाठी सुवर्णा धनवटे २६४ मते मिळवून विजयी झाले. प्रभाग तीन मध्ये अनुसूचित जमाती स्त्री मधुकर महाले 234 मते मिळून विजयी, अनुसूचित जाती स्त्री सुजाता दिलीप पगारे 240 मते मिळून विजयी झाल्या.

प्रभाग चार मधून सर्वसाधारण जागेसाठी दिलीप राजोळे 486 मते मिळून, अनुसूचित जाती स्त्री जागेसाठी सविता पगारे 472 मते मिळवून विजयी तर सर्वसाधारण श्री जागेसाठी सविता निवृत्ती पवळे 460 मते मिळून विजयी झाल्या.

प्रभाग पाच मधून सर्वसाधारण जागेसाठी श्रीराम प्रल्हाद नागरे 249, अनुसूचित जमाती स्त्री जागेसाठी राणी नंदू सिंगूमारे 283 मते मिळून विजयी तर सर्वसाधारण जागेसाठी शोभा नारायण म्हस्के 329 मते मिळून विजयी झाल्या.

प्रभाग सहा मधून सर्वसाधारण जागेसाठी संजय महादू ताजनपुरे 332 मते, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री जागेसाठी सुचिता भिमाजी घुगे 288 मते मिळून तर सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या लढतीत निर्मला लीला दर जावळे 319 मते मिळून विजयी झाल्या.

The post Nashik : एकलहरे ग्रामपंचायतीच्या लढतीत विशाल संगमनेरे ठरले किंगमेकर, शंकर धनवटे यांचा पराभव appeared first on पुढारी.