Nashik : कार पार्किंगवरून वाद, हनुमानवाडीत माय-लेकास मारहाण

महिलेला मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कार पार्किंगवरून कुरापत काढून दोघांनी मिळून माय-लेकास मारहाण केल्याची घटना हनुमानवाडीतील चौधरी मळा परिसरात ३१ ऑक्टोबरला घडली. यात रुपेश सुभाष सूर्यवंशी (४१) व त्यांची आई यांना मारहाण झाली आहे.

रुपेश सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सुरेश पाटील, दीपक पाटील यांनी कार पार्क करण्यावरून कुरापत काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. रुपेश यांची आई त्यांना वाचवण्यासाठी आली असता संशयितांनी त्यांनाही मारहाण केली. यात रुपेश यांच्या आईकडील दागिने गहाळ झाले आहेत. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post Nashik : कार पार्किंगवरून वाद, हनुमानवाडीत माय-लेकास मारहाण appeared first on पुढारी.