Nashik : कुटुंबात २१ वर्षांनी पाळणा हलणार होता, पण एका घटनेनं सगळं सपलं…

चक्कर येऊन मृत्यू,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

घरात चक्कर येऊन पडल्याने गर्भवती महिलेसह जुळ्या बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शहरातील पाथर्डी फाटा परिसरात शुक्रवारी (दि.१०) सकाळच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार पूजा देवेंद्र मोराणकर (४५) असे मृत गर्भवतीचे नाव आहे. पाथर्डी फाट्यावरील आनंदनगर येथे मोराणकर कुटुंबीय राहतात. शुक्रवारी सकाळी आंघोळीनंतर बाथरूममधून बाहेर आल्यानंतर पूजा मोराणकर यांना अचानक चक्कर आली. त्या घरातच कोसळल्या. यावेळी त्यांचे वडील रमेश चिंतामण पाखले आणि बहीण घरातच होते. त्या अचानक जमिनीवर कोसळल्याचे पाहून पाखले यांनी तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, पूजा यांच्यासह त्यांच्या गर्भातील जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. विशेष म्हणजे, या कुटुंबात तब्बल २१ वर्षांनी पाळणा हलणार होता. परंतु, एका क्षणातच होत्याचे नव्हते झाले. या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

गर्भवतीसह जुळी बाळेही दगावल्याची ही वार्ता पाथर्डी फाटा परिसरात वेगाने पसरली. सायंकाळच्या सुमारास पूजा यांच्या घराबाहेर मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी त्यांच्या पार्थिवार शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांसह त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

गर्भवतीसह जुळे बाळही दगावल्याने ही वार्ता पाथर्डी फाटा परिसरात वेगाने पसरली. आज सायंकाळच्या सुमारास पुजा यांच्या पार्थिवार अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळीपरिसरातील नागरिकांसह उपस्थित होते. या प्रकरणी इंदिरा नगर पोलिस ठाणे येथे नोंद करण्यात आली आहे

हेही वाचा : 

The post Nashik : कुटुंबात २१ वर्षांनी पाळणा हलणार होता, पण एका घटनेनं सगळं सपलं... appeared first on पुढारी.