Nashik : खड्डेमुक्तीसाठी बांधकाम विभागाचे नवीन पोर्टल; मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खड्डेमुक्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पोर्टल तयार केले आहे. त्यावर खड्ड्याचा फोटो टाकल्यावर आठवडाभरात त्याची दखल घेतली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. ना. चव्हाण यांनी नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची शुक्रवारी (दि.२) आढावा बैठक घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. हे टाळण्यासाठी यंदा बांधकाम विभागाकडून प्रयत्न केले जात असून, त्यासाठी एक नवीन पोर्टल तयार करण्यात आले आहे. यात खड्ड्यांचा फोटो टाकल्यावर सात दिवसांच्या आत ते भरले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. कोकणातील भौगोलिक रचना बघता दरडी कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यादृष्टीने विभागाकडून यंदा अधिक काळजी घेतली जाणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post Nashik : खड्डेमुक्तीसाठी बांधकाम विभागाचे नवीन पोर्टल; मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती appeared first on पुढारी.