Site icon

Nashik : टॅंकर चालकांचे कामबंद आंदोलन, इंधन पुरवठा ठप्प

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मनमाडच्या नागापूर, पानेवाडी परिसरात काल (दि. 25) टॅंकर रस्त्यावर उभे करण्याच्या वादातून टॅंकरच्या काचा फोडून चालकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ इंधन वाहतुक दारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. परिणामी अनेक जिल्ह्यांचा इंधन पुरवठा ठप्प झाला आहे.

रात्री अज्ञात लोकांनी हल्ला करून टँकरच्या काचा फोडल्यामुळे टँकर चालक, मालक संतप्त झाले असून त्यांनी संप पुकारला आहे. यामध्ये, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन गॅस प्लांट या चार ही प्रकल्पातुन इंधन आणि गॅस सिलेंडर वाहतूक करणारे टँकर, ट्रक चालक, मालक आणि ट्रान्सपोर्टर यांनी कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. परिणामी डेपोतून केला जाणारा पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर पुरवठा ठप्प झाला आहे.

हेही वाचा :

The post Nashik : टॅंकर चालकांचे कामबंद आंदोलन, इंधन पुरवठा ठप्प appeared first on पुढारी.

Exit mobile version