Nashik : तीव्र उकाड्याने नाशिककर त्रस्त, पारा ३९ अंशांपलीकडे

उन्हाचे चटके,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी पारा ३९.१ अंश सेल्सिअस नाेंदविण्यात आला. तीव्र उकाड्यामुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत.

अवकाळी पावसानंतर मागील दोन दिवसांपासून हवेतील आर्द्रता नाहीशी झाली आहे. त्यामुळे नाशिकमधील उकाड्यात वाढ झाली आहे. सकाळी दहापासून उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होत असून, दुपारी १२ ते ४ यावेळेत सर्वाधिक उष्मा जाणवतो. त्यामुळे या कालावधीत शहरातील रस्ते निर्मनुष्य होत आहेत. उन्हापासून बचावासाठी नागरिक एसी, पंखे, कूलरची मदत घेत आहेत. मात्र, उन्हाचा तडाखा अधिक असल्याने तेथेही गरम हवा निर्माण होत असल्याने घरात बसणे मुश्कील झाले आहे.

ग्रामीण भागातही उन्हाचा जोर कायम आहे. शेतीकामांना त्याचा फटका बसतो आहे. सोबतच उन्हाचा तडाखा अधिक असल्याने दैनंदिन कामकाजावरही परिणाम झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात पुढील तीन दिवस ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज आहे. तसेच दिवसाच्या सरासरी तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची वाढ होऊ शकते. त्यामुळे शहरासह एकूणच जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : तीव्र उकाड्याने नाशिककर त्रस्त, पारा ३९ अंशांपलीकडे appeared first on पुढारी.