Site icon

Nashik : ‘त्या’ चौघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

नाशिक (वणी): पुढारी वृत्तसेवा

वणी सापुतारा रस्त्यावरील अपघातातील मृत झालेल्या चौघा मित्रांवर आज (दि. 1) एकाचवेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी धडपड करणा-या तरुणांवर नियतीने अशाप्रकारे घाला घातल्याने संपुर्ण शहर शोकसागरात बुडालं आहे.

काल (दि. ३०) सायंकाळी वणी सापुतारा रस्त्यावर भीषण अपघात झाला. त्यात वणी येथील विनायक गोविंद क्षिरसागर (३७), योगेश दिलीप वाघ (१८), जतिन अनिल पावडे (२३), रविंद्र मोतीचंद चव्हाण (२२) रा. वणी मोठा कोळीवाडा येथील चौघा मित्रांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरात आज  बंद पाळण्यात आला आहे. कुटंबातील कर्ते तरुण गेल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.  चौघांचे पितृछत्र हरपले आहे.

विनायक क्षीरसागर याला दोन मुले आहे. एक पाच वर्षाचा तर एक दिड वर्षाचा आहे. जतिन पावडे यांच्या वडीलांचा पाच वर्षापूर्वी एकादशीच्या दुस-या दिवशी मृत्यू झाला होता. आता तेच जतिनच्या बाबतीत घडलं.  चौघांच्या अपघाताची माहिती वा-यासारखी शहरात पसरली होती. लोकांना कळताच नातेवाईक, मित्र मंडळी यांनी काही अपघात स्थळाकडे तर काही वणी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र उशीर झाला होता, त्या चौघांमित्रावर काळ भारी पडला.  आज (दि. १) जूलै रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या दरम्यान वणी येथील स्मशानभूमीत चौघांवर एकाच वेळेस अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते.

अश्या घटनांचा आघात अनेक वेळा

वणी शहरावर अपघाताच्या अश्या मोठ्या घटनांचा आघात अनेक वेळा झाला आहे. यात कुटूंब, मित्र परिवार एकाच वेळेस अपघातात मृत्यू झाल्याचा घटना घडल्या आहेत. पठाण कुटुंबातील ३७ वर्षांपूर्वी अजमेर येथे यात्रेसाठी गेले असतांना मध्यप्रदेशातील इंदोर जवळ अपघात होवून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. १२ फेब्रुवारी १९९७ रोजी प्रतिष्ठीत व्यापरी कटारीया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होतो. ३१ जुलै २००३ रोजी घोटी जवळ मुंबई-आग्रा महामार्गावर वणीचे माजी उपसरपंच अश्पाक मनियार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला होता.  यात तिघे घोटी येथील होते. २८ जुन २०१४ मध्ये तुळजापूरला जातांना वणी जगदंबा माता मंदीराचे तत्कालीन अध्यक्ष संजय यशवंत थोरात यांचे दोन पुतने व लखमापूर येथील मामा साहेबराव देशमुख असा चौघांचा स्विप्ट डिझायर गाडीचा अपघात होवून मृत्यू झाला होता. तसेच डिसेंबर २०१५ रोजी मित्राची पार्टीसाठी गेल्या साहिल जावरेसह पाच मित्रांचा वणी-कळवण रस्त्यावर झाडावर कार आढळून मृत्यू झाला होता. तर तीघे जखमी झाले होते. २४ जानेवारी २०१९ रोजी वणीचे प्रतिष्ठीत व्यापारी संजय समदडीया हे भाचीचे लग्न आटोपून वणी येथे येत असतांना चांदवड जवळ त्यांच्या कारला अपघात होवून संजय समदडिया यांच्यासह पत्नी व मुलगा असा तीघांचा जागीच मृत्यू झाला होता. (दि. ३०) रोजी वणी या चौघांच्या मृत्यूने वणीकरांना दुखःद घटनेची आठवणी करून दिली.

हेही वाचा : 

The post Nashik : 'त्या' चौघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Exit mobile version