Nashik : द्राक्ष रशियात एक्स्पोर्ट होणार होती ; पण वादळी वाऱ्याने तोंडचा घास हिरावला…

लासलगाव द्राक्ष बाग नुकसान,www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात अवकाळीचा कहर थांबला असे वाटत असताना गुरुवारी (दि.30) रात्री वादळी वाऱ्याचा जोर वाढल्याने लासलगावला येथे शेतकऱ्याची दीड एकरावरील द्राक्षबाग पूर्णत: भुई सपाट झाली आहे. ही द्राक्ष रशियात एक्स्पोर्ट होणार होती. मात्र, ऐन काढणीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे शेतकऱ्याचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

कोटमगाव रोडवरील बाजार समितीजवळ शेतकरी प्रल्हाद कमलाकर पाटील यांचा दीड एकरावर द्राक्षबाग आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने ही बाग भुईसपाट झाली आहे. पाटील यांनी अनेक संकटावर मात करत द्राक्षबाग टिकवली होती. निफाड तालुक्यात १५ दिवसांपूर्वी अवकाळी व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच आता वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान झाले आहे. ही बाग दोन दिवसांपूर्वीच व्यापारी पाहून गेले होते. त्यात 50 ते 55 रुपये दर मिळणार हे निश्चित असतानाच पूर्णच द्राक्षबाग कोसळल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा :

The post Nashik : द्राक्ष रशियात एक्स्पोर्ट होणार होती ; पण वादळी वाऱ्याने तोंडचा घास हिरावला... appeared first on पुढारी.