Nashik : पिंपळगाव बाजार समितीत परिवर्तन अटळ : अनिल कदम

अनिल कदम,www.pudhari.news

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना पिंपळगाव बाजार समितीमध्ये अनेक वाईट अनुभव आले आहे. सभापती आमदार दिलीप बनकर यांनी गेल्या तेवीस वर्षात मनमानी कारभार करत प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीमध्ये आपण लोकमान्य परिवर्तन पॅनलच्या वतीने सक्षम उमेदवार उभे करणार असल्याने ऐतिहासिक परिवर्तन अटळ आहे, असा विश्वास निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांनी व्यक्त केला.

लोकमान्य परिवर्तन पॅनलचा शेतकरी संवाद मेळावा चीतेगाव फाटा येथील कुलस्वामिनी लॉन्स येथे काल सायंकाळी उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते चिंतामण दादा सोनवणे होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते भास्कर नाना बनकर, गोकुळ गिते, अमृता पवार, डॉ. प्रल्हाद डेरले, दिलीप नाना मोरे, प्रभाकर कुयटे, अशोक निफाडे, सदाशिव खेलुकर, सुधीर कराड, निलेश पाटील, विक्रम रंधवे, बाळासाहेब जाधव, माणिकराव शिंदे, शरद कुटे, बाबाजी कुषारे, राजेश पाटील, केशव आप्पा बोरस्ते, आबा गडाख, आनंदराव बोराडे, देविदास चौधरी, जि. प. सदस्य दीपक शिरसाठ, अतुल शहा, कचरू राजोळे, दत्तू भुसारे, नंदू कुशारे, दौलत कडलग, व्यापारी अतूल शहा, योगेश ठक्कर आदि उपस्थित होते.

लोकमान्य परिवर्तन पॅनलच्या शेतकरी संवाद मेळाव्याला निफाड तालुक्यातील ग्रामपंचायत – सोसायटी मतदारांसह शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मा. आमदार अनिल कदम यांनी यावेळी आपल्या भाषणातून सभापती आमदार दिलीप बनकरांच्या २३ वर्षांच्या भ्रष्टाचारी कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढत खुले आव्हान दिले. जेष्ठ नेते भास्कर बनकर, अमृता पवार, गोकुळ गिते यांनीही पिंपळगाव बाजार समितीच्या दिलीप बनकर यांच्या हिटलरशाही कारभारावर टीकास्त्र सोडून सत्ता परिवर्तन घडविण्याचे आवाहन केले. आमदार दिलीप बनकर समर्थक चाटोरीचे सोसायटीचे चेअरमन सदाशिव खेलुकर, रौळसचे माणिकराव शिंदे, हिरालाल सानप यांनीही मेळाव्यात व्यासपिठावर आवर्जून उपस्थिती लावल्याने चर्चेचा विषय झाला.

आ. दिलीप बनकर यांच्या एककल्ली – हुकूमशाही कारभारामुळे बाजार समितीत परिवर्तन अटळ असल्याचे यावेळी अध्यक्ष चिंतामण सोनवणे यांनी सांगितले. निफाड कारखान्याच्या १३/१२ सत्तासंघर्ष वेळी आर्थिक रसद पुरवणारे आमदार दिलीप बनकर हेच निसाकाच्या दुरावस्थेला जबाबदार असल्याचा आरोप सायखेड्याचे माजी उपसरपंच शरद कुटे यांनी केला. मेळाव्याचे सूत्रसंचालन खंडू बोडके-पाटील तर प्रास्ताविक पंडीतराव आहेर यांनी केले. यावेळी मेळाव्यास अनिरुद्ध पवार, रामराव डेरे, अशपाक शेख, शहाजी राजोळे, सागर जाधव, राजेंद्र राजोळे, विजय गवळी, पांडूरंग कांडेकर, भास्कर डेरले, गोपाळनाना बोडके, निलेश दराडे, सुनिल कदम, प्रदीप नाना कदम, दिलिप कदम, मधुकर शिरसाठ, किरण गाडे आदीसह तालुक्यातील सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post Nashik : पिंपळगाव बाजार समितीत परिवर्तन अटळ : अनिल कदम appeared first on पुढारी.