Nashik : बदलत्या हवामानाने नाशिककर त्रस्त

तापमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठवड्यापासून नाशिक शहर व परिसरातील हवामानात सातत्याने हवामानात बदल होत आहेत. दिवसा कडक ऊन आणि रात्री गारठा जाणवतो आहे. या विचित्र हवामानामुळे नाशिककर त्रस्त झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि.१०) शहरात १२.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.

उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिक शहराच्या तापमानात चढ-उतार होत आहे. त्यातच कमाल तापमानाचा पारा ३४.७ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे दिवसभर चटका देणारे ऊन्ह व रात्री थंडी अशा विचित्र हवामानाला नागरिकांना सामाेरे जावे लागते आहे. वातावरणातील या बदलामुळे सर्वत्र ताप, सर्दी-पडसे अशा साथजन्य आजारांमध्ये भर पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत.

जिल्ह्याच्या अन्य भागातही ऊन-थंडीचा खेळ सुरू असल्याने ग्रामीण जनजीवनावर त्याचा माेठा परिणाम होत आहे. येत्या सोमवारपासून उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यातील अन्य तापमानात बदल होईल. तसेच काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान निर्माण होईल, असा अंदाज हवामाना विभागाकडून वर्तविणण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post Nashik : बदलत्या हवामानाने नाशिककर त्रस्त appeared first on पुढारी.