Site icon

Nashik : भाविकांच्या गर्दीने फुलले त्र्यंबकेश्वर

नाशिक (त्र्यंबकेश्वर) पुढारी वृत्तसेवा

मंदिरात धूप दाखविण्याच्या कथित प्रकरणाने तापलेले शहरातील वातावरण आता थंड झाले आहे. नारायण नागबलीसह विविध धार्मिक पूजा विधींसाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. शहरात निवासाच्या सुविधा कमी पडत असल्याने मुक्कामासाठी भाविक दोन-तीन किलोमीटर अंतरावरील लॉजिंग बोर्डिंगचा आधार घेत आहेत. अर्थकारणाची चाके पुन्हा गतिमान झाल्याने दुकानदार आणि पुरोहितांचे चेहरे फुलले आहेत.

उन्हाळ्याच्या सुटीमुळे भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे. पहाटेपासून कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी उसळत आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारी घडलेल्या कथित मंदिर प्रवेशाचे पडसाद सर्वदूर उमटले. त्यामुळे येथील गर्दी काही काळ कमी झाली होती. २०० रुपये दर्शन शुल्काच्या माध्यमातून मंदिर ट्रस्टला मिळणारे उत्पन्न कमी झाले होते. त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाबाबत शहरापेक्षा राज्यात अधिक चर्चा झाली होती. मात्र येथील स्थानिक ग्रामस्थांनी सामंजस्य दाखविले. पोलिस यंत्रणेने अत्यंत कौशल्याने परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी घेतली.

दरम्यान मागच्या शनिवार, रविवारपासून भाविकांचा ओघ पुन्हा सुरू झाला. या शनिवारी तर मध्यंतरी गर्दीन उच्चांक गाठला. २०० रुपये दर्शनरांगेत दोन तास, तर पूर्व दरवाजा दर्शनबारीत चार तास दर्शनासाठी थांबावे लागत होते. भाविकांना विविध सेवा-सुविधा पुरवठा करणा-या व्यवसायांना सुगीचे  दिवस आले आहेत. मे महिन्याची अखेर असल्याने सुटी संपण्यापूर्वी भाविक येथे मोठ्या संख्येने येत आहेत. त्याचा लाभ येथील अर्थकारणाला झाला आहे.

हेही वाचा :

The post Nashik : भाविकांच्या गर्दीने फुलले त्र्यंबकेश्वर appeared first on पुढारी.

Exit mobile version