Nashik : ‘महाआवास’मध्ये नाशिक विभागाला 23 पुरस्कार

महाआवास योजना,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ अंतर्गत नाशिक विभागाला २३ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्याला पाच पुरस्कार मिळाले.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा सर्वोत्कृष्ट विभाग तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नाशिक विभागाला मिळाला असून, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला. तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेत द्व‍ितीय क्रमांकाचा पुरस्कार नाशिक विभागाला प्राप्त झाला आहे. विभागात अन्य जिल्ह्यांमध्ये नगरला विविध श्रेणींमध्ये १० पुरस्कार मिळाले आहेत. तसेच धुळ्याला पाच, जळगावला दोन व नंदुरबारला एक विभागात पुरस्कार प्राप्त झाला.

नाशिक जिल्ह्याला पाच पुरस्कार

विभागात नाशिक जिल्ह्याला पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. देवळ्यातील कणकापूर ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट गृहसंकुलाची निर्मितीसाठी तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय राज्य पुरस्कृत आवास योजनेमधील संख्यात्मक प्रगतीनुसार सर्वोत्तम जिल्ह्यात नाशिक जिल्हाधिकारी यांना तृतीय क्रमाकांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक यांना इतर विशेष उपक्रम राबविल्याने प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच नाशिक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प संचालक व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना शबरी आवास योजना द्वितीय पुरस्काराने गौरव करण्यात आला असून, चांदवड येथील जितेंद्र शिंदे डेटा एंट्री ऑपरेटर यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

हेही वाचा :

The post Nashik : 'महाआवास'मध्ये नाशिक विभागाला 23 पुरस्कार appeared first on पुढारी.