Nashik : मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आज नाशिकमध्ये

श्रीकांत शिंदे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

प्रधानमंत्री आत्मनिर्भर पथविक्रेता निधी योजनेअंतर्गत (पीएम स्वनिधी) बँकामार्फत पथविक्रेत्यांना कर्ज वितरण करण्यात येते. त्यानुषंगाने खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने स्वयंरोजगार कर्ज वितरण महामेळावा दि. २८ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास शिवसेनेचे युवा नेते खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात केंद्र शासन पुरस्कृत पीएम स्वनिधी आणि डे-एनयुएलएम योजनेतर्गत पथविक्रेते, बचतगट व वैयक्तिक स्वयंरोजगार लाभार्थींना बँकामार्फत कर्ज मंजूर/वितरण करण्यात येणार आहे. पीएम स्वनिधी योजनेतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त परिचय बोर्ड सदर कार्यक्रमात पथविक्रेत्यांना वाटप करण्यात येणार असून कर्ज मिळालेल्या सर्व पथविक्रेत्यांना ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणेसाठी क्यू-आर कोड वाटप करणे ते कसे वापरावे त्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

युवती सेनेच्या शाखेचे अनावरण

दरम्यान, महामेळाव्या निमित्त नाशिक दौऱ्यावर येणारे खासदार श्रीकांत शिंदे यांचे सकाळी १० वाजता विल्होळी भागातील जैन मंदिर येथे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांच्या प्रभागात युवती सेनेच्या पहिल्या शाखेचे अनावरण खा. शिंदेंच्या हस्ते हाेईल. त्यानंतर कवीवर्य कुसूमाग्रज यांच्या शासकीय जलतरण तलावालगत असलेल्या निवाससस्थानी भेट देतील.

हेही वाचा :

The post Nashik : मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आज नाशिकमध्ये appeared first on पुढारी.