Nashik :…म्हणून जुन्या नाशकात गोवरचे सर्वात जास्त रुग्ण

गोवर,www.pudhari.news

जुने नाशिक : कादिर पठाण

मागील वर्षाअखेर डिसेंबर महिन्यात शहरातील एकूण २२ रुग्णांपैकी ६ रुग्ण एकट्या जुन्या नाशकातील मुलतानपुरा भागात आढळून आल्याची माहिती मनपाकडून जाहीर करण्यात आली व मनपाने हा भाग गोवर उद्रेक म्हणून घोषितही केला. मात्र याच भागात रुग्णसंख्या जास्त का आढळली, याबाबत दै. ‘पुढारी’ने केलेल्या पाहणीत काही कारणे समोर आली. जुने नाशिक हा अत्यंत दाट लोकवस्तीचा भाग असून, या भागात महापालिकेकडून नियमित स्वच्छता होत नसल्याने ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले आहे. शिवाय गोवर हा एक अत्यंत सांसर्गिक, तीव्र आणि तापदायक आजार असल्याने दाट लोकवस्तीच्या भागात त्याचा प्रसार झपाट्याने होत असतो. शिवाय लहान मुलांना या आजाराची लागण लवकर होते. जुन्या नाशकातही दाट लोकवस्तीमुळेच या आजाराची लागण जास्त जणांना झाली आहे. म्हणून नागरिकांनी गोवरसारख्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.

ही आहेत कारणे

गोवरचा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या नाक आणि घशाच्या श्लेष्मामध्ये वाढतो आणि हा रोग खोकला, श्वासोच्छ्वास आणि शिंकणे याद्वारे इतर लोकांमध्ये पसरण्यास सक्षम आहे. जेव्हा संक्रमित लोक बोलतात, खोकतात किंवा शिंकतात तेव्हा दूषित थेंब हवेत सोडले जातात (जेथे इतर लोक श्वास घेऊ शकतात) किंवा पृष्ठभागावर स्थिर होतात, जिथे ते जास्त काळ संसर्गजन्य आणि सक्रिय राहतात.

ही आहेत लक्षणे

गोवरचे लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहे, जास्त ताप, अशक्तपणा, खोकला, वाहणारे नाक, गोवर पुरण, घसा खवखवणे, स्नायू वेदना, हलकी संवेदनशीलता.

डॉक्टरांना कधी भेटावे?

जर तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला गोवरचा संसर्ग झाला असेल, तर तुमच्या प्राथमिक काळजी घेणार्‍या डॉक्टरांचा सल्ला घ्या, जो तुम्हाला गोवर तज्ञांकडे पाठवू शकेल. तुमचा गोवर डॉक्टर तुम्हाला लस घेतली आहे का ते विचारू शकतात आणि गोवरची चिन्हे आणि लक्षणांबद्दल विचारू शकतात.

टाळता येणारा आजार

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांप्रमाणे गोवर, ज्याला रुबेलादेखील म्हणतात, हा एक अत्यंत सांसर्गिक, तीव्र आणि तापदायक श्वसन विषाणूजन्य आजार आहे. जो लहान मुलांसाठी गंभीर ठरू शकतो, परंतु गोवर लसीद्वारे तो सहज टाळता येऊ शकतो.

हे लक्षात ठेवा

संक्रमित लोकांशी जवळचा संपर्क टाळा, भरपूर विश्रांती घ्या, संसर्ग झाल्यास अलगावमध्ये रहा, लस घ्या, नाक ओले करण्यासाठी खारट अनुनासिक फवारण्या वापरा. कमी द्रव प्या, तुमचे व्हिटॅमिन ए सप्लिमेंट चुकवा, पुरळांवर घासून घ्या, गर्दीच्या ठिकाणी बाहेर जाणे टाळा.

साधारण बाळांना लसीचा पाहिलं डोस नऊ महिने तर दुसरा डोस अठरा महिने पूर्ण झाल्यावर दिला जातो. मात्र गोवर उद्रेक भागात पाच वर्षाच्या आत असलेल्या लहान बाळांना लसीचा तीसरा अतिरिक्त डोस व जीवनसत्व अ चे डोस दिले जाते. गोवर स्वतःला मर्यादित करणारा रोग आहे. हजारात एखाद्या बाळाला गुंतागंतीची संभावना असते. ज्यात निमोनिया इत्यादींचा समावेश आहे. वेळेवर लसीकरण करून घेणे या रोगावर प्रतिबंधक ठरते.

– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, मनपा

गोवर मध्ये शरीरावर पुरळ उठते आणि खाज सुटू शकते. ज्यामुळे गुलाबी रंगाचे ठिपके दिसतात. शरीरात उष्णता वाढल्याने खाज येण्याचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता असते. आमच्या पिंजार घाट भागातील मागील काही महिन्यात गोवरचे रुग्ण आढळले आहे. मी नागरीकांना आवाहन करतो की वेळेवर आपल्या बाळांना लसीचा पाहिलं आणि दुसरा डोस द्यावा तसेच गोवर ची लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

– डॉ. आकीब पिरजादे, महबुबे सुबहानी वक्फ ट्रस्ट, पिंजार

हेही वाचा :

The post Nashik :...म्हणून जुन्या नाशकात गोवरचे सर्वात जास्त रुग्ण appeared first on पुढारी.