Nashik : रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का? मनसेचे अनोखे आंदोलन

नाशिककरोड

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

येथील जय भवानी रोड तसेच परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात यावे व महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नाशिकरोड विभागाने आज बुधवारी (दि.१४) अनोखे आंदोलन छेडत घोषणाबाजी केली. येथील रस्त्यांवर तिन पिंडे ठेवत या कावळयांनो परत फिरारे, रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का ? अश्या आशयाचे फलक झळकवत मनपा अधिका-यांच्या विरोधात आंदोलन केले.

मागील काही दिवसांपासून नाशिकरोड परिसरात सतत पडणा-या पावसामुळे जवळपास सर्वच रस्त्यांवर खडडे पडलेले दिसतात. यापैकी काही रस्त्यांचे खड्डे महापालिका प्रशासनाने बुजविलेले आहे. मात्र जयभवानी रोडची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकरोड विभाग अध्यक्ष विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे अनोखे आंदोलन छेडण्यात आले.

याप्रसंगी संतोष पिल्ले, सुरेश घुगे, प्रमोद साखरे, संतोष सहाणे, रोहन देशपांडे, नितीन धानापुणे, नितीन पंडीत, मयुर कुकडे, अशोक ठाकरे, रंजन पगोरे, दत्ता कोठुळे, अजिंक्य जाधव, भाऊसाहेब ठाकेर, दिलीप सोनकांबळे, शहराध्यक्ष भानुमती अहीरे, जिल्हाध्यक्ष रिना सोनार, रागीनी कोदे, दिपाली कदम, डिंपल गुप्ता, संदीप कदम, बाबा गोडसे आदी उपस्थित होते.

जयभवानी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आम्ही अनेकवेळा महापालिका अधिका-यांसोबत संपर्क केला. खडडयांमुळे अनेक अपघात घडले. भविष्यात काही  जिवितहानी झाली तर जबाबदार कोण ? यासाठी आम्ही हे अनोखे आंदोलन छेडले.  – विक्रम कदम, मनसे विभाग अध्यक्ष नाशिकरोड

परिसरात ठिकठिकाणी खडडे पडलेले दिसतात. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला अनेकवेळा कळविले. मात्र त्यांनी कायम दुर्लक्ष केले. त्यांनी दखल घ्यावी यासाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागला. – प्रमोद साखरे, पूर्व विधानसभा निरीक्षक नाशिकरोड

हेही वाचा :

The post Nashik : रस्त्यांच्या पिंडाला कावळा शिवेल का? मनसेचे अनोखे आंदोलन appeared first on पुढारी.