Site icon

Nashik : लासलगावी ब्रह्मोत्सव निमित्त भव्य मिरवणूक

लासलगाव : (जि. नाशिक) वार्ताहर

येथील बालाजी मंदिर सेवा समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी ब्रह्मोत्सव समारंभानिमित्त स्वर्ण-चांदीच्या अलंकाराने आभूषित श्री बालाजी, श्रीदेवी, श्रीभूदेवी यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सोने-चांदीच्या आभूषणांनी सजविलेले श्री. बालाजी भगवान, विद्युत रोषणाई केलेले आकर्षक चित्ररथ, श्री महावीर विद्यालय यांचे लेझीम पथक, लाठी काठी प्रात्यक्षिक, विंचूर येथील पारंपारिक वाद्यवृंद, श्री संत नामदेव महिला मंडळाने विठ्ठल रुख्मिनीचा उत्कृष्ठ नृत्य आणि देखावा सादर केला.

श्री बालाजी मंदिरात सकाळी नवकलश अभिषेक, आरती, प्रसाद कार्यक्रम झाल्यावर सायंकाळी श्री लक्ष्मीनारायण मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. या मिरवणुकीत महाभारतामधील अर्जुन आणि कृष्णाचा देखावा विषेश आकर्षण होते. अर्जुनाच्या वेष भूषेत प्रणव पवार तर श्री कृष्णाच्या वेष भूषेत गौरव वर्मा होते.

मिरवणूक पाटील गल्ली, किल्ल्याच्या मागे, अहिल्यादेवी चौक, शनिमंदिर, बाजारपेठ, शिवाजी चौक मार्गे, कोटमगाव रोडने श्री बालाजी मंदिर आवारात शोभायात्रेची सांगता झाली. या ब्रह्मोत्सव मिरवणुकी नंतर गोविंद प्रसाद पुरस्काराचे वितरण होऊन महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

हेही वाचा :

The post Nashik : लासलगावी ब्रह्मोत्सव निमित्त भव्य मिरवणूक appeared first on पुढारी.

Exit mobile version