Nashik : वणी पोलिसांकडून बेकायदा दारू जप्त; एकास अटक

वणी,www.pudhari.news

वणी  (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथील पोलिसांनी अवैध देशी दारू विक्रीविरोधात धडक मोहीम सुरू करत गुरुवारी (दि.३०) रात्री २.३० च्या सुमारास देवठाण शिवारात छापा टाकून ८७ हजार ३६० रुपयांची बेकायदा देशी दारू जप्त केली. तसेच या प्रकरणी एकास अटक केली.

देवठाण येथील एका घरात देशी दारूचा बेकायदा साठा असल्याची माहिती सपोनी नीलेश बोडखे यांना मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री देवठाण येथील भगवान गुंबाडे (वय ३०) यांच्या घरामागील पडवीत धाड टाकली असता ८७ हजार ३६० रुपयांचे देशी दारूचे २६ बाॅक्स साठा बेकायदा विक्रीसाठी साठवलेला आढळला. हा ऐवज जप्त करून गुंबाडेवर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. कारवाई पोलिस नाईक सुमित जाधव, ए. एम. जाधव, पोलिस नाईक उदार, पोलिस शिपाई किरण धुळे, पोलिस नाईक कुणाल मराठे यांनी ही मोहीम राबविली.

हेही वाचा :

The post Nashik : वणी पोलिसांकडून बेकायदा दारू जप्त; एकास अटक appeared first on पुढारी.