Nashik : साई दर्शनास निघालेल्या दोघा सायकलस्वारांवर काळाचा घाला

दोघांवर काळाचा घाला,www.pudhari.news

नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर शहरातील लोंढे गल्लीतील पाच तरुण मित्र सायकलवरून शिर्डीस जात असताना पाथरे शिवारात पाठीमागून येणार्‍या महिंद्रा कारच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन सायकलस्वार किरकोळ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. 11) सकाळी 6.30 च्या सुमारास घडली.

आदित्य महेंद्र मिठे (24) व कृष्णा संतोष गोळेसर (17) अशी मृत तरुणांची नावे आहेत. पाचही सायकलस्वार रस्त्याच्या डाव्या बाजूने एका मागे एक असे चालत असताना ईशान्येश्वर मंदिराकडे जाणार्‍या कमानीसमोर मुंबई-विरारहून शिर्डीकडे जाणार्‍या महिंद्रा एक्सयुव्ही कारने (एमएच 48 एके 6286) मागील दोन सायकलस्वरांना जोरदार धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, शिकाऊ महिला चालक कार चालवत असल्याने अपघात झाला असावा असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. दरम्यान, अपघातावेळी धडकेचा आवाज ऐकून रस्त्यालगत वास्तव्यास असलेल्या तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या युवकांनी पांगरी येथील रुग्णवाहिकेला पाचारण केले. जखमी सायकलस्वारांना सिन्नर येथे उपचारांसाठी हलविण्यात आले. कारमधील किरकोळ जखमी प्रवासी मुंबईचे होते. त्यांना उपचारांसाठी मुंबईतला पाठवण्यात आले. वावी पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik : साई दर्शनास निघालेल्या दोघा सायकलस्वारांवर काळाचा घाला appeared first on पुढारी.