Nashik : सिन्नरच्या अपहरण झालेल्या मुलाची सुटका, संशयितच चिरागला घरी सोडून पळाले

सिन्नर अपहरण,www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर शहरातील चौदाचौक वाडा परिसरातून कांदा व्यापाऱ्याच्या 12 वर्षीय मुलाचे अज्ञात दोन इसमांनी अपहरण केल्याची घटना गुरुवारी (दि.5) रात्री 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास घडली होती. चिराग कलंत्री असे या अपहरण झालेल्या मुलाचे नाव मात्र, चिरागला मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी घरापासून जवळच असलेल्या नगरपरिषद कार्यालय परिसरात सोडून पोबारा केला आहे.

चिराग स्वतःच घरी परतल्यानंतर कलंत्री कुटुंबीयांसह पोलीस यंत्रणेचा जीव भांड्यात पडला. तथापि अज्ञात व्यक्तींनी चिरागचे अपहरण केल्यानंतर त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. मात्र यावेळी चिरागला पकडून गाडीत घातले त्यावेळी त्यांनी स्वतः काळे मास्क आणि काळे कपडे घातलेले होते अशी माहिती चिरागणे कुटुंबीयांना दिली. पोलीस आरोपींचा कसून शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. या प्रकाराने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं ?

तुषार कलंत्री हे कांदा व्यापारी असून त्यांचा मुलगा चिराग हा गुरुवारी रात्री 7 ते 7.30 वाजेच्या सुमारास 14 चौक वाडा परिसरात काळेवाडा येथे खेळत असताना सफेद रंगाच्या नंबरप्लेट नसलेल्या मारुती ओम्नी गाडीतून आलेल्या अज्ञात इसमांनी चिरागचे अपहरण करुन मारुती ओम्नीतून पसार झाले. रात्री 7.30 वाजेच्या सुमारास वडील तुषार कलंत्री यांनी चिराग घरात न आल्याने बाहेर जाऊन शोध घेतला असता सफेद रंगाच्या मारुती ओम्नी गाडीतून आलेल्या इसमांनी चिरागला पळवले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

तुषार यांनी लागलीच सिन्नर पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलगा चिरागचे अपहरण झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र चिराग ला संशयितांनी सुखरुप घऱी सोडून ते फरार झाले आहेत.

हेही वाचा :

The post Nashik : सिन्नरच्या अपहरण झालेल्या मुलाची सुटका, संशयितच चिरागला घरी सोडून पळाले appeared first on पुढारी.