Nashik : सुरगाणा नगरपंचायतीतर्फे पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण

सुरगाणा,www.pudhari.news

नाशिक, सुरगाणा प्रतिनिधी

सुरगाणा नगरपंचायतीमार्फत शहरातील छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या सर्व पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण सुरु करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, सर्वेक्षणासाठी येणाऱ्या नगरपंचायतीच्या प्रतिनिधीला पथविक्रेत्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.

सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रतिनिधीला पथविक्रेत्यांनी त्यांच्या दुकानाचा फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक असलेला मोबाइल नंबर आदी माहिती द्यावी. दि. ३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत शहरातील पथविक्रेत्यांनी पथविक्रेता प्रतिनिधी यांच्याकडे अथवा सुरगाणा नगरपंचायत कार्यालयात कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. जे पथविक्रेते कागदपत्रे मुदतीत जमा करणार नाहीत, त्यास नगरपंचायत जबाबदार राहणार नाही, असा इशारा नगरपंचायत प्रशासनाने दिला आहे.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे या सर्व पथविक्रेत्यांचे व्यवसाय बुडाले, अनेक जणांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना व्यवसायात पुन्हा उभे करण्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीमार्फत केंद्र शासनाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली आहे. या योजनेतून पात्र लाभार्थी पथविक्रेत्यांना पतपुरवठा केला जाणार आहे.

हेही वाचा :

The post Nashik : सुरगाणा नगरपंचायतीतर्फे पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण appeared first on पुढारी.