
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील ६५ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या २६ हजार ८८० जागांसाठी आॅनलाईन केंद्रिभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत सोमवारी (दि.१२) दुसऱ्या गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात आली होती. मागील तीन दिवसांमध्ये या फेरीत अडीच हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे. Nashik 11th Admission
इयत्ता अकरावीच्या (Nashik 11th Admission) केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिल्या फेरीत ११ हजार ९५३ विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती. त्यापैकी केवळ ८ हजार १४१विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. पहिल्या फेरीअंती १८ हजार ७३९ जागा रिक्त होत्या. या रिक्त जागांसाठी दुसऱ्या गुणवत्ता यादी जाहिर करण्यात आली होती. त्यात तब्बल ८ हजार १८० विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या यादीसाठी ४ हजार ८९० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी २ हजार ६८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यात कोटांतर्गत प्रवेश घेतलेल्या २५१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, दुसऱ्या फेरीत निवड झालेल्या विदयार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी मुदत बुधवारी (दि.५) संपल्याने आता तिसऱ्या प्रवेश फेरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. गुरूवारी (दि.६) तिसऱ्या प्रवेश फेरीच्या रिक्त जागांचा अहवाल प्रसिध्द जाणार आहे. तर पुढील आठवड्यात या फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर होण्याची चिन्हे आहेत.
प्रवेशाची सद्यस्थिती
महाविद्यालय संख्या : ६५
प्रवेश क्षमता : २६,८८०
प्रवेश निश्चिती : १०,८२५
रिक्त जागा : १६,०५५
हेही वाचा :
- मोठा अनर्थ टळला! जालन्यात रेल्वेमार्गावर घातपाताचा कट; रुळावर ठेवला लोखंडी ड्रम
- सोलापूर : संचालकांचा दूध संघाच्या उत्कर्षापेक्षा संपत्तीवरच डोळा
- Nashik : त्र्यंबकेश्वरला तलाठ्यासह कोतवालास लाच घेताना अटक
The post Nashik 11th Admission : दुसऱ्या फेरीत २,६८४ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.