Nashik : 94 वे साहित्य संमेलन आता भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होण्याची शक्यता

<p>नाशिकमध्ये पुढे ढकललेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता 3 ते 5 डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. हे संमेलन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणाऐवजी आता भुजबळ नॉलेज सिटीमध्ये होण्याची शक्यता आहे, कोरोना संसर्ग वाढल्यानं साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आलं होतं. महाविद्यालयं सुरू झाल्यानं गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जागेऐवजी आता नव्या जागेचा शोध घेतला जातोय. त्यात मुक्त विद्यापीठ, भुजबळ नॉलेज सिटी यासह अन्य काही जागांचा विचार केला जातोय. पण स्वागताध्यक्ष छगन भुजहळ यांच्या भुजबळ नॉलेज सिटीची निवड होण्याचीच शक्यता अधिक आहे.</p>