Nashik Accident : अंबडलिंकरोडवर पुन्हा भीषण अपघात, महिला ठार

file photo

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा

सातपूर अंबड लिंक रोडवर अपघात होऊन कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच याठिकाणी पुन्हा दुसरा अपघात झाला आहे. दत्तमंदिर जवळ दुपारी दोनच्या सुमारास आयव्हा गाडीला मोटारसायकलचा कट लागून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.  Nashik Accident

पूनम नितीन चव्हाण (वय ३०) रामकृष्ण नगर, अंबड )असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. उपचारा दरम्यान जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. Nashik Accident

अधिक माहितीनुसार, महिलेचे दुचाकीवरुन नियंत्रण सुटल्याने महिला ट्रकच्या मागील चाकात सापडल्याने गंभीर जखमी झाली होती.  महिलेला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सायंकाळी उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले असून रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम चालू होते. या अपघाताचा पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत. दरम्यान सातपूर त्र्यंबक रोड व अंबडलिंक रोड परिसरात लागोपाठ झालेल्या ३ अपघाती मृत्यूने सर्व सातपूर व लिंक रोड परिसर हळहळ व्यक्त करीत आहे.

हेही वाचा :

The post Nashik Accident : अंबडलिंकरोडवर पुन्हा भीषण अपघात, महिला ठार appeared first on पुढारी.