Nashik Accident : चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप व्हॅनची दुकानाला धडक; 4 जण किरकोळ तर 2 जण गंभीर जखमी

<p>पूजा साहित्य विक्री दुकानाला भरधाव पिक अप व्हॅनने जोरदार धडक दिली. मुंबई नाशिक महामार्गावर इगतपुरीतल्या घाटनदेवी मंदिरासमोर हा अपघात घडला आहे. चालकाचा वाहनवरील ताबा सुटल्याने पिकअप व्हॅन बॅरिगेट्स तोडून सरळ दुकानात घुसली. यात दोन जण गंभीर जखमी झालेत तर दोन जण किरकोळ जखमी आहेत. सुदैवाने नवरात्रोत्सव संपल्याने मंदिराबाहेर भाविकांची जास्त गर्दी नव्हती ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.</p>