
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक दिंडोरी रोडवरील करी लिव्हज हॉटेल जवळ रविवार (दि. २०) रोजी रात्री पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. मेघराज अरुण देशमुख (वय २९, रा. लखमापूर, ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक) असे मयताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील मेघराज देशमुख हे दुचाकी क्रमांक एमएच ४१ एपी ५०९७ हून रविवार (ता.२०) रोजी कामानिमित्त नाशिक कडे चालले होते. रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान दिंडोरी रोडवरील करी लिव्हज हॉटेल जवळ नाशिक कडून दिंडोरी कडे जाणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक एमएच १५ एचएच ६४८५ ने धडक दिली. यात दुचाकी स्वार मेघराज देशमुख हे जागीच ठार झाले.
या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत. मेघराज यांच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. लखमापूरच्या माजी सरपंच सुभद्रा अरुण देशमुख यांचे चिरंजीव होत.
हेही वाचा :
- कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तपदी के मंजूलक्ष्मी यांची नियुक्ती
- पारनेर तालुक्यातील शेतकरी सोशल मीडियावर आक्रमक
The post Nashik Accident : पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार appeared first on पुढारी.