Nashik accident : मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : नाशिकमध्ये नांदूर नाक्‍याजवळ खासगी बस आणि ट्रेलरचा आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बसला भीषण आग लागली. या अग्नितांडवात संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. या घटनेत 11 प्रवाशांचा मृत्‍यू झाला असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने तातडीचे वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच जखमींच्या उपचारात कुठलीही कमतरता भासू नये अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच या अपघातातील जखमींचा सर्व खर्च सरकार करणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. दरम्यान या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे.

The post Nashik accident : मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर appeared first on पुढारी.