Nashik Accident : वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार

Accident

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार झाल्याची घटना घडली. मुंबई-आग्रा महामार्गावरील ट्रॅक्टर शोरूमसमोर भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार ठार झाला, तर सीबीएस सिग्नलजवळ रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेचा एसटी बसच्या धडकेने मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुखंराज आयंदजी प्रजापत (४०, रा. निफाड) आणि हिरालाल मोडाराम गुज्जर हे दुचाकीने नाशिकहून ओझरच्या दिशेने जात होते. कॅप्टन ट्रॅक्टर शाेरूमजवळ त्यांच्या दुचाकीला कारने (एमएच ४१, बीएच ८४८४) जोरदार धडक दिली. यात प्रजापत यांचा मृत्यू झाला, तर गुज्जर गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आडगाव पोलिसांमध्ये कारचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना सीबीएस परिसरात घडली. लता रामदास चव्हाण (४०, रा. लेखानगर) ह्या पायी रस्ता ओलंडत होत्या. त्याचवेळी एसटी महामंडळाच्या वडझिरे-नाशिक बसने (एमएच ४०, वाय ५६६८) चव्हाण यांना जोरदार धडक दिली. यात चव्हाण यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांत संशयित बसचालक अशोक तुकाराम शिंदे (५८, रा. सिन्नर) यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post Nashik Accident : वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार appeared first on पुढारी.