Nashik Accident : ॲम्बुलन्स येण्याआधी सिटीलिंक आली धावून

नाशिक बस अपघात ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

यवतमाळहून निघालेल्या खासगी बसला नाशिकमध्ये झालेल्या अपघातातील जखमींना वेळीच जिल्हा रूग्णालयासह खासगी रूग्णालयात पोचविण्याचे काम नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बसने केले. यामुळे अनेकांवर तत्काळ उपचार सुरू झाल्याने सिटीलिंकची सिध्दता पुन्हा एकदा सिध्द झाली आहे.

विदर्भातील यवतमाळ येथून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला शनिवारी (दि.८) नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण अपघात होऊन त्यात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर ३८ हून अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तत्काळ सिटीलिंककडे जखमींच्या बचाव कार्यासाठी मदत मागितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अवघ्या काही मिनिटात पहाटे पाच वाजेच्या सुमारास सिटीलिंकने दोन बसेस मदतीसाठी घटनास्थळी पाठवल्या. सिटीलिंकने शेवटपर्यंत अपघातग्रस्तांची प्रशासनासोबत मदत करत बचावकार्य केले. मुख्य म्हणजे ॲम्बुलन्स येण्यापूर्वीच सिटीलिंक घटनास्थळी दाखल झाल्याने अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यास हातभार लागला.

त्यामुळे अनेक प्रवाशांना वेळीच उपचार मिळण्याबरोबरच अनेकांचे प्राण देखील वाचविता आले. कनेक्टिंग नाशिक या ब्रीद वाक्यानुसार कायम नाशिककरांशी कनेक्ट असलेल्या सिटीलिंकने पुन्हा एकदा आपली कार्यतत्परता दाखवत सिटीलिंक कायम नाशिककरांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे दाखवून दिले आहे.

हेही वाचा :

The post Nashik Accident : ॲम्बुलन्स येण्याआधी सिटीलिंक आली धावून appeared first on पुढारी.