Site icon

Nashik Accident : आयशरची दुचाकीला धडक; एक ठार दोन जखमी

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

भरधाव वेगातील आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीचालक ठार झाल्याची घटना घडली आहे. तर दुचाकीवरील दोघे जखमी झाले आहेत.

सोमनाथ पुंनाजी पवार, वय 30 रा. वैतागपाडा, ता. दिंडोरी,  दिपाली सोमनाथ पवार व पुनाजी पवार असे तिघे MH 15 DX 3897 या क्रमांकाच्या दुचाकीवरुन कळवण वणी रस्त्यावरुन जात असताना समोरुन भरधाव वेगात MH 41 AU 6038 या क्रमांकाचे आयशर वाहन आले. चंडिकापुर फाट्यावर या वाहनाने दुचाकीला धडक दिली.  झालेल्या अपघातात सोमनाथ पवार ठार झाला. तर दिपाली व पुनाजी हे जखमी झाले. अपघातानंतर आयशर चालक फरार झाल्याची तक्रार संजय पवार यांनी वणी पोलिसात दिली. आयशर चालकाचा शोध पोलिस घेत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Accident : आयशरची दुचाकीला धडक; एक ठार दोन जखमी appeared first on पुढारी.

Exit mobile version