Nashik Accident : 12 जणांचा मृत्यू, ओळख पटविण्यासाठी DNA टेस्ट करणार

बसला भीषण अपघात

नाशिक : पुढारी ऑनलाइन

नाशिकमध्ये पहाटेच्या सुमारास हॉटेल मिर्ची येथील सिग्नलवर अपघात झाला. ट्रक धुळे हुन औरंगाबादच्या दिशेने जात होती तर बस मुंबईच्या दिशेने जात होती. दोन्ही वाहने सिग्नल ओलांडत असताना ट्रकच्या इंधन टाकीजवळ बसची धडक बसली. त्यानंतर दोन्ही वाहने काही अंतर फरफटत गेली व छोटा हत्ती या वाहनावर धडकले. अपघातानंतर इंधनाचा भडका उडून बस पेटली. या अपघातात एकुण 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकुण 30 जखमी प्रवाशांना नजिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जखमींमध्ये तिघांची प्रकृती गंभिर आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नसून DNA आणि ईतर फॉरेन्सिक टेस्ट करून ओळख पटवली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी  गंगाथरन डी. यांनी दिली आहे. मृतांमध्ये दहा पुरुष, एक महिला व एका लहान मुलीचा समावेश आहे. मदत कार्यासाठी प्रशासनामार्फत टोल फ्री नंबरही देण्यात आला आहे.  दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाशिकला येत आहेत. घटनास्थळी व जिल्हा रुग्णालयात जखमींची ते पाहणी करणार आहेत.

हेही वाचा :

The post Nashik Accident : 12 जणांचा मृत्यू, ओळख पटविण्यासाठी DNA टेस्ट करणार appeared first on पुढारी.