Nashik Amit Shah: अमित शाह दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर ABP Majha

<p>केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारपासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. शाहांच्या दौऱ्याच्या जिल्हा प्रशासनाने १४ पथकं तयार केली आहेत. तसंच या दौऱ्यात सुरक्षित अंतराचे कटाक्षाने पालन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.&nbsp;</p>