Site icon

Nashik APMC Election : पिंगळे गटाची सरशी, भास्कर गावित २४९ मतांनी विजयी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठीच्या मतदान प्रक्रियेला सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवरात सुरूवात झाली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १८ जागांकरिता होत असलेल्या निवडणुकीत तीन जागा बिनविरोध झाल्या असल्याने उर्वरित १५ जागांसाठी ३७ उमेदवारांसाठीची शनिवार (दि. २९) रोजी मतदान मोजणी प्रक्रियेला शांततेत आणि चोख पोलीस बंदोबस्तात सुरूवात झाली आहे.

यात पिंगळेंच्या आपलं पॅनलचे ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसुचित जमाती गटातून भास्कर गावित २४९ मताधिक्याने विजयी झाले आहे. यात भास्कर गावित यांना ८९९ तर चुंभळे गटाच्या यमुना जाधव यांना ६५० मते मिळाली. तर अपक्ष अलका झोमन यांना २४१ मते मिळाली. या गटात एकूण २००० मतदान झाले तर वैध मते १७९० झाली. यात २१० अवैध मते आढळली.

हेही वाचा :

The post Nashik APMC Election : पिंगळे गटाची सरशी, भास्कर गावित २४९ मतांनी विजयी appeared first on पुढारी.

Exit mobile version