Nashik : Chhagan Bhujbal पालकमंत्री झाल्यानंतर नाशिकमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं : Pravin Darekar

<p>विरोधी पक्षाकडून आता अन्न व औषध प्रशासनमंत्री छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय... भाजप पदाधिकारी अमोल इघे हत्या प्रकरणातील आरोपी हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे... आणि याला राजकीय वरदहस्त आहे का?... असा सवाल प्रवीण दरेकरांनी विचारलाय.... युनियनच्या वर्चस्वावरुन वाद झाल्याचं स्पष्ट आहे. आरोपी विनोद बर्वे याने लावलेल्या युनियनच्या बॅनरवर छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे फोटो आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी विनोद बर्वेने राष्ट्रवादीत प्रवेश केला. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे.</p>