Nashik CNG Hike : नाशकात सीएनजीच्या दरांमध्ये 2 रुपयांची वाढ, गेल्या 26 दिवसात एकूण 15 रुपयांची वाढ

<p>पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरुन केंद्र आणि राज्य सरकार असा वाद सुरु असताना आता सीएनजीच्या दरांमध्येही वाढ होऊ लागली आहे. नाशिकमध्ये सीएनजीच्या दरांमध्ये 2 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सीएनजीचा दर 80 रुपये किलोवर पोहोचला आहे. राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात सीएनजीवरील कर कमी केल्यामुळे नाशकात 1 एप्रिलला सीएनजीचे दर 65.25 रुपये इतके होते. मात्र, गेल्या 26 दिवसांमध्ये या दरांमध्ये टप्प्याने 15 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हे दर पुन्हा 80 रुपयांवर पोहोचले आहेत. या वाढीव दरांबाबत सीएनजीच्या डिलरला विचारले असता त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात येत नाही. दरवाढीबाबत विचारायचं असल्यास आमच्या पुण्यातील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधा, अशी उत्तरं डिलरकडून देण्यात येत आहे. या वाढीव दरांमुळे सर्वसामान्यांना मात्र चांगलाच फटका बसतोय.</p>