Nashik Corona | नाशकात कोरोना नियमांचं सर्रास उल्लघंन; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

<p>नाशिकमध्ये आज पहिल्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला व्यावसायिकांकडून केराची टोपली दाखवण्यात आली. आजपासून जिल्ह्यातील सर्व दुकानं, आस्थापना यांना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत परवानगी देण्यात आलीय. पण सात वाजून गेल्यानंतरही बाजारपेठांमध्ये गर्दी बघायला मिळतेय. ना पालिकेचं याकडे लक्ष आहे. ना पोलिसांचं. विशेष म्हणजे अनेक व्यापाऱ्यांना या आदेशाबद्दल माहितच नसल्याचं पाहायला मिळतंय.</p>